Share Market Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय या बद्दल माहिती अगदी सोप्या भाषेत.
शेअर मार्केट ला स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार सुद्धा म्हटले जाते, शेअर मार्केट मध्ये नेहमी दोन शब्द येतात, शेअर आणि मार्केट आपण या दोन्ही शब्दाचे अर्थ समजून घेऊया. आणि नंतर दोन्ही शब्द एकत्र करून शेअर मार्केट ये जाणून घेऊया.
सर्वात अगोदर जाणून घेऊया मार्केट काय असते, मार्केट मराठी शब्द आहे बाजार, जिथे वस्तूची खरेदी विक्री होते , वेग वेगळ्या प्रकारचे मार्केट असतात. जसे कि कपड्याचे मार्केट , मच्छी मार्केट , भाजीपाला मार्केट , इलेक्ट्रॉनिक मार्केट , इत्यादी.
आता तुम्हला समजले असेल कि मार्केट म्हणजे काय जिथे वेगवेगळ्या वस्तू आपण खरेदी करतो आणि विकतो.
आता आपण समजून घेऊया शेअर काय असतो , शेअर चा मराठी अर्थ होतो हिस्सा , आता हा हिस्सा नक्की कोण्हाचा असतो , तर हा हिस्सा असतो वेग वेगळ्या मोठ्या कंपन्यांचा.
ह्या कंपन्यांना जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते मार्केट मध्ये येतात आपले काही शेअर विकून ते पैसे उचलतात.
उदाहरणार्थ टाटा हि कंपनी खूप मोठी कंपनी आहे आता टाटा ला तिच्या नवीन प्रोजेक्ट साठी काही रकम ची गरज आहे , आता टाटा चा मॅनेजर तुमच्याकडे आला म्हणाला आम्हला २ हजार इतकी रकमेची गरज आहे आम्हला २ हजार रुपये द्या आणि आमचे २ % शेअर घ्या जर तुम्ही सुद्धा सहमती दाखवली
२ हजार रुपये दिले आणि २ % टाटा च्या नवीन कंपनी चे मालक झाले, आता इथे तुम्ही जे २ % विकत घेतले त्याला म्हणतात शेअर म्हणजे हिस्सा.
आता आपण शेअर आणि मार्केट ला एकत्र करूया , शेअर मार्केट अशी जागा आहे इथे शेअर ची खरेदी विक्री केली जाते , इथे तुमचे सारखेच लोक येतात , जे वेगवेगळे कंपनी चे शेअर ची म्हणजे हिस्स्याची खरेदी विक्री करतात.
आता तुमच्या कडे टाटा कंपनी चे २ % शेअर आहे ज्याची किंमत २००० रुपये आहे , आता टाटा च्या नवीन कंपनी ने खूप चांगला व्यवसाय केला अनेक प्रोजेक्ट वर काम केले ज्यामुळे त्याचा खूप चांगला नफा झाला
आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे पहिले ज्या कंपनी ची किंमत १ लाख पर्यंत होती आता ती झाली २ लाख पर्यंत म्हणजे तुमच्या २ हजार च्या शेअर ची किंमत झाली ४ हजार रुपये म्हणजे तुमचे पैसे दुपटं झाले.
आता तुम्हला तुमचे शेअर विकायचे आहे मग तुम्ही शेअर मार्केट मध्ये जाता आणि तिथे जाऊन घोषणा करतात कि माझ्याकडे टाटा चे अमुक कंपनी चे ४ हजार रुपये चे शेअर आहे कुन्हाला विकत घेयचे आहेत का.
तिथे एका व्यक्तीने तुमची घोषणा ऐकली आणि त्यांनी विचार केला कि टाटा ची कंपनी चांगली आहे आणि भविष्य काळात या शेअर ची किंमत वाढेल तेव्हा त्या व्यक्तीने ते ४ हजार चे शेअर विकत घेतले
आता तुमचा चांगला च फायदा झाला, कारण तुम्हला २ हजार च्या बदल्यात मिळाले ४ हजार, आणि भविष्य काळात त्या शेअर ची किंमत वाढेल किंवा कमी होईल या वरून त्या व्यक्तीचा नफा किंवा तोटा अवलंबून असतो .
आता तुम्हला कळलं असेल कि शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट हि अशी जागा आहे जिथे शेअर ची खरेदी विक्री होते , जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये अजून खोलात जल तर शेअर मार्केट बदल अजून भरपूर स काही आहे.