Sutrasanchalan Charolya in Marathi | सुत्रसंचालन चारोळी मराठी

Sutrasanchalan Charolya in Marathi:- Sutrasanchalan charolya bhashan, Marathi charolya, Marathi Sutrasanchalan.

Sutrasanchalan Charolya in Marathi

हर्ष उल्हास आणि आनंदाने
स्वागत सर्व मान्यवरांचे…
सोहळ्याच्या शुभसमयी या
गाणी गातो सुस्वागताचे…

अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण

एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.

देवाला हात जोडून
स्वस्थ बसायच नसत
देव घडवीत नाही
आपण घडायच असतं

पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते!
चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !
म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे
म्हणजे भाग्यच असते ! तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो

हीच प्रार्थना !

प्रास्ताविक
गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची

गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून

बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन

थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

स्वागत नसे हे फक्त
आहे हा तर जिव्हाळा…
आपल्या पद स्पर्शाने
पावन झाला सोहळा.

You may also like...

close