Vat Purnima Information In Marathi:- भारतीय संस्कृतीत वट पौर्णिमा हा सर्वात महत्वाचा सण आहे, वट पौर्णिमा हा विवाहित स्त्रियांचा महत्वाचा सण असतो, जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हि वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
भारतीय संस्कृतीत वडाचे झाड पूजनीय मानले जाते, या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकू अक्षता, नेवेद्य वाहून वडाची झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून स्त्रिया पाच प्रदक्षिणा घालतात.
झाडाच्या नेसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला सुद्धा आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभावे, हा त्यामागचा हेतू आहे, पूजेचे व्रत करून निसर्गातील झाडाचे सर्वधन करणे हाच या सणाचा एकमेव हेतू आहे.
या दिवशी घरोघरी पुरण पोळीचा बेत केला जातो, सर्व स्त्रिया वटपौर्णिमा हा सण भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करतात.
आता आपण जाणून घेऊया हा ह्या वडाची एक प्रसिद्ध कथा
वट पौर्णिमा हि जेष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमा ला असते, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले, यमराजाला तिच्या पतीचे प्राण परत देण्याकरिता भाग पाडले, तिने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले.
ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते वृक्ष वडाचे होते, त्यावेळी सावित्रीने वडाची पूजा मनोभावाने केली, म्हणूनच सर्व स्त्रिया वट पौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रिया वडाची पूजा करतात.
सावित्रीने सत्यवान बरोबर विवाह केला आणि सावित्रीला कोण्ही तरी सांगितले होते कि तिच्या पतीला एका वर्षाच्या आत मृत्यू येणार आहे,
ज्या दिवशी तिच्या पतीचा मृत्यू होणार आहे ते तीन दिवस तिने उपवास केले, तिचा पती एक दिवस अरण्यात गेला सावित्री त्याच्या बरोबर गेली, ते वनातील शोभा पाहत चाले होते, पण सावित्रीचे मन मात्र जागेवर होते, कारण तिला माहित होते पतीच्या मृत्यू ची वेळ जवळ आलीय.
सत्यवानाने सर्व फळ गोळा केली, वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो एका झाडावर चढला, न जाणे त्याला कशामुळे त्याला अचानक चक्रर आली आणि त्याच्या डोळ्या समोर अंधार येत होता , सावित्रीला हे सर्व कळत होते, तिने मोट्या धीराने पतीला सांगितले, नाथ आपण थोड्या वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपल्याला बरं वाटेल
सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून जोपला, तितक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला, क्षणात त्याने सत्यवान प्राण हरण केले, हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषच्या चरणी मस्तक ठेवले, तिने त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला आणि विचारले आपण कोण,
आणि तो दिव्य पुरुष म्हणाला मी प्राण हरण करणारा यमराज आहे , यमराज तिचे पतीचे प्राण घेऊन जाऊ लागला , त्याच बरोबर सावित्री देखील त्याच्या पाठीमागे चालू लागली.
ये पाहून यमराज म्हणाला सावित्री तू पतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस मी तुझ्या पती सेवेवर अतिशय प्रसन्न आहे तेव्हा तुला जो हवा तो वरदान माग,
तेव्हा सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळावे असा वर मागितला व चमत्कार झाला आणि सत्यवान पुन्हा जिवंत झाला,
सावित्रीची आपल्या पती वर किती निष्ठा आहे याची हि परीक्षा होती , यावरून सावित्रीने पती निष्ठा आणि व पतिव्रता या गुणाने प्रत्यक्ष यमराजाला हरवले अशी हि कथा आहे.
महान पती व्रता सावित्रीने साक्षात यम धर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घ आयुष्याची प्रपात्ती करून दिली, या दिवशी सुहासिनी स्त्रियांनी सावित्रीची पूजा करावी वडाच्या झाडास सूत गुंढाळून पूजा करावी व समूहात पणाने या कथेचे वाचन करावे, त्याच प्रमाणे श्रवण करावे.
याच वट वृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते म्हणून या वटवृक्षाचे अनन्य साधारण अशे महत्व आहे