Labour Day Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत कि जागतिक कामगार दिन का साजरा केला जातो, सर्व प्रथम आपण जाणून घेऊया कामगार म्हणजे काय आणि कोण हे आपण जाणून घेऊया.
तर कामगार समाजातील एक असा घटक किंवा वर्ग आहे जो देशाला प्रगती च्या दिशेने, उन्नती चा दिशेने घेऊन जाण्यास मदत करतो. कारण एका राष्ट्राची जी प्रगती आहे हि वेगवेगळ्या क्षेत्रात होत असते कधी शैक्षणिक , कधी तांत्रिक , तर कधी वैज्ञानिक, कोणत्याही कार्यच कागदी काम पूर्ण झाल्यानंतर जे काम राहत ते म्हणजे त्याला अस्तित्वात आणणे ,आणि या साठी जे गरजेचं आहे ते म्हणजे मनुष्य बळ आणि हे आपल्याला प्रदान करून देते ते म्हणजे कामगार वर्ग.
तर याचाच अर्थ काय कि कामगार वर्ग हा समाजातील एक अत्यंत महत्वाची भूमिका असलेला घटक , या कामगारामुळेच आपला देश प्रगतीच्या दिशेने झेप घेत आहे.
पण हाच कामगार वर्ग एकेकाळी अतिशय बिकट परिस्तिथी कोंडला गेलेला आणि याची दक्षता घेऊन, आणि कामगार दिनाच्या शुभेच्या देताना डोळ्यासमोर उभी राहते एका महामानवांची प्रतिमा आणि आठवण करून देते त्याची कामगाराविषयी तळमळ आणि त्याविषयी त्यांनी केलेले कार्य , असे महामानव स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेबानी कामगारांची परिस्तिथी पाहताच, त्याच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवणाऱ्या व्यासपीठ नाही हे लक्षात येताच १५ ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
बाबासाहेबानी कामगाराची व्यथा , प्रश्न व परिस्तिथी एका वेगळ्या वळणार वर आणले, कामगार हा फक्त आणि फक्त राबण्यासाठी असतो अशी मानसिकता असणाऱ्या लोकांना मधून दूर केले आणि वेळोवेळी पगार आणि त्याची सुरक्षा व अनेक रजेचे अर्ज स्वीकारणे सुरु केले.
स्वतंत्र मंजूर पक्षाच्या वतीने कामगारांसाठी स्वतंत्र कायदे तयार केले, कामाचे तास १५, १८ तास च्या ऐवजी 8 तास , सणाच्या सुट्या , आजार पणाच्या सुट्या , महिला गर्भवती असल्यास पगारसहित सुट्या त्याची सुरक्षा , कामाच्या वेळी काही गैर सोयी होऊ नये , याची काळजी घेणे व काम करताना जर काही दुखापत झाली तर त्याची भरपाई करणे , त्याच्या मुलाचे शिक्षण इत्यादी.
अश्या अनेक कायद्यामुळे आपला कामगार समाज सुरक्षित झाला. बाबासाहेबानी संविधानात ज्या कायद्याची तरतुदी केल्या त्या आपल्या संपूर्ण भारतीय समाजासाठी आहे.
बाबासाहेबांच्या बहुमौल्या योगदान मुळेच आज आपल्या समाजामध्ये जी कामगाराची सुस्तिथि दिसत आहे त्यात बाबासाहेबांचा निश्चितच सिहाचा वाटा आहे. म्हणूनच बाबासाहेब सर्व कामगारांसाठी एक खूप मोठे आदर्श आहे, हि बाब आपण सर्वानी लक्षात ठेवणे गरजेचं आहे.
पण अलीकडे हे हेच कामगार कायदे यांमध्ये बदल करून कामगाराची गैरसोय झालेली आपल्याला दिसते , आता कोणताही कामगार पर्मनंट नसून कंत्राटदार दाराच्या हाताखाली काम करेल कामगाराला कामात कार्यरत असताना जर काही दुखापत झाली तर त्याची भरपाई करून देण्यात येणार नाही.
म्हणजेच कामगारांची तीच परिस्थिती आहे , कामगार सगळीकडून कोंडीत आलेले आपल्याला दिसून येते , यामुळेच कामगार वर्ग कुठेतरी उदास झालेला आपल्याला दिसून येते , आणि याचा प्रभाव पडतो असा कि आपल्याला देशाला सध्याची परिस्थिती ज्ञात असून बरेच बेरोजगार आपल्याला दिसतात.
या बेरोजगारांना अतिशय कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवून त्यांना राबवण्यात येईल कमीत कमी वेतन देऊन जास्तीत जास्त काम करून घेतल्या जाईल आणि या मध्ये कामगार वर्ग हा अतिशय अवघड रित्या चिरडल्या जाईल , आजकालच्या नवयुगामध्ये प्रत्येक काम इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञामुळे आणि रोबोट्स च्या माध्यमातून होत आहे.
किंवा आपण असेही बोलू शकतो याच प्रमाण आज जास्तीत जास्त वाढला आहे , याचाच अर्थ असा कामगाराची गरज कमी होत चालली दिसून येत आहे मनुष्य बळ कमी झालेलं आहे.
कारण जो काम एखादा व्यक्ती ज्या वेळेत करतो त्यापेक्षा कमी वेळेत रोबोट हा ते काम करून देतो हि झाली एक बाजू, दुसरी बाजू म्हणजे जेव्हा एखादा बरोजगाराला रोजगार मिळेल तो फक्त आणि फक्त कामातच गरफटून जाईल आणि सरकारी पातळीवर जे संविधानात कामगार कायदे मध्ये बदल करण्यात करार पास केल्या जात आहे तो तसाच राहील आणि त्याच्या कडे न लक्ष दिल्यामुळे आणि ते बिनवरोधी या कायद्यामध्ये बदल करतील आणि याचाच दुष्परिणाम म्हणजे अगोदर नमूद केल्या प्रमाणे दिसून येतील.
मित्रानो माहिती मध्ये काही चुका अडल्यास आम्हला संपर्क साधावा आम्ही त्यात लगेच सुधार करू
क्रेडिट Sakshi Panchal.
महाराष्ट्र दिन शुभेच्छा | Maharashtra Day Wishes In Marathi
बालदिन वर मराठी निबंध | Children’s Day Essay In Marathi