Dhanteras Information In Marathi:- दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण, या दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी, धनाचा वर्षाव करणाऱ्या या धनत्रयोदशी ला दिपावलीत अनन्या साधारण महत्व आहे.
आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्या बद्धल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशी चा दिवस साजरा केला जातो.
धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसे व सोने चांदी याची पूजा करून आपली व आपल्या कुटूंबाची प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते. चला तर मग आज आपण या धनत्रयोदशी चे अध्यात्मिक महत्व जाणून घेऊया.
धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटल्या जाते! धनत्रयोदशी हि अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते.
मुख्यतः व्यापारी आणि शेतकरी याना हा दिवस खूप महत्वाचा असतो या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थ बनवले जातात, कुटूंबातील मंडळी एकत्र येतात आणि आनंदानी दिवाळी साजरी करतात, शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसाय शी संबंधित अवजारांची पूजा करतात.
शेतकरी नगर, तिफण, कुदळ, फावडे ,इत्यादी शेती च्या संबंधीत असलेली सर्व अवजारांची पूजा केली जाते, तर इकडे व्यापारी तिजोरी हिशोबाच्या वह्या सोने नाणे इत्यादी ची या दिवशी पूजा करतो.
बळीराजा शेतात पिकलेल्या धान्याची पूजा करतो त्यासाठी धने गुल खोबरे आणि पुरण पोळी चा नैवेध दाखवतो तसेच झेन्डु ची फुले देखील देवाला वाहिली जातात, अंगणात पणत्या लावली जातात घरांना विद्युत रोषणाई केली जाते.
गाव आणि शहर सर्वंकडे पणत्या लावून सजवले जाते,सर्व अस्मान पणत्या आणि रोषणाई ने उजळून निघतोच व नाहून निघतो, या धनत्रयोदशी सबंधीत दोन अतिशय मनोव्यतक कथा आहे.
हेमा नावाचा एक राजा असतो त्याचा पुत्राला अकाली मृत्यूचा श्राप मिळालेला असतो या श्राप नुसार राजाचा मुलगा वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्यू मुखी पडणार असतो, राजा व राणी आपल्या मुलाला मिलेल्या या श्रापाने दुखी असतात.
मात्र आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे घ्यावी म्हुणुन त्याचे ते लग्न लावून देतात, लग्न नंतर चा चोथा दिवस हा तो मृत्यू मुखी पडण्याचा दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्याला जोपू देत नाही त्याला सतत जागे रहायची प्रयत्न करत असते , त्याच्या अवती भोवती सोन्या चांदीची मोहरा ठेवल्या जातात, महालाचे मुख्य द्वार असेच सोन्या चांदीने मंडले जाते.
जेणेकरून मृत्यूचे देवता यम महालामध्ये प्रवेश करू शकणार नाही, संपूर्ण महाल च दिवे लावून लख लखीत केल्या जातो , इकडे त्याची पत्नी त्याला वेगवेगळ्या गोष्टी व गाणी म्हणून त्याला जागी राहण्याचा प्रयत्न करीत असते.
आणि शेवटी ती घडी समीप येऊन ठेपते, यम सापाचे रूप धारण करतो आणि राज महालाकडे येऊ लागतो, मात्र तो जेव्हा राज महालात सर्प रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यमाचे डोळे सोन्या आणि चांदीचे अलंकाराने दिपून जातात, त्याला समोरचे स्पष्ट दिसेनासे होते, आणि या कारणास्तव यमाला आपल्या यमलोकी परतावे लागते.
आणि राजकुमाराचे प्राण वाचतात, तर मित्रानो अशी आहे धनत्रयोदशी पहिली कथा. या दिवसाला यमदीपदान असेहि म्हटले जाते.
यमदीपदान परंपरा आज हि अनेक ठिकाणी पाळतात, याचा विधी थोडक्यात असा आहे या दिवशी सायंकाळी घर बाहेर दिवा लावतात दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला करतात ,त्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करतात.
असे केल्याने यम देवता आपला मार्ग बदलते आणि आपला अपमृत्यू टाळतो असं मानलं जात.
आता जाणून घेऊया धनत्रयोदशी दुसरी कथा तीच नाव आहे समुद्र मंथन महर्षी दुर्वास यांनी दिलेल्या श्रापातून मुक्त होण्यासाठी असुर म्हणजेच राक्षस आणि सूर म्हणजे देव यांनी मिळून समुद्र मंथन केले , तेव्हा त्या समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली, त्यानंतर या समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ बाहेर घेऊन आला.
चार हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात अमृत कलश दुसऱ्या हातात जळू तिसऱ्या हातात शंख आणि ४ हातात चक्र घेऊन जन्माला आला. या चारही हातातील गोष्टीचा उपयोग करून अनेक व्यादींना रोगांना बरे करण्याचे काम धन्वंतरी भगवान करतो.
म्हणूच धन्वंतरी ची या दिवशी पूजा केली जाते, या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंती चा आहे. वैध मंडळी या दिवशी धन्वंतरी चे पूजन करतात, प्रसाद म्हणून कडू निबाची बारीक केलेली तुकडे आणि साखर असे लोकांना देतात, कडू निबाची उत्पत्ती अमृतापासून झालीय असे मानतात.
कडू निबाची दररोज पाच ते सहा पाने सेवन केल्याने सर्व प्रकाच्या व्याधी माणसापासून दूर राहतात असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी तोच धन्वंतरी चा प्रसाद म्हणून देण्यात येतो,
ज्या घरामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे त्या धनाची या दिवशी पूजा करतात येथे धन याचा अर्थ शुद्ध लक्ष्मी असा होतो, मात्र श्रीसुक्तात वासू म्हणजेच पृथ्वी, जल , वायू , अग्नी आणि सूर्य याना सुद्धा धन्स म्हटले आहे.
या दिवशी लोक सोने खरेदी करणे पसंद करतात , या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक उन्नत्ती होते असा समज आहे.
आपण सोन्या ऐवजी कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात शास्त्रानुसार केवळ सोनेच खरेदी करावे असे कुठलेही बंधन नाही.
धनत्रयोदशी या वर्षी 02 नबंवर २०२१ मंगळवारी आहे
धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी, आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्या बद्धल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशी चा दिवस साजरा केला जातो.
आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्या बद्धल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशी चा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या व्यवसाय शी संबंधित वस्तू ची पूजा करतात