Bhaubeej Information In Marathi | भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती

Bhaubeej Information In Marathi: नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भाऊबीज या सणाविषयी, भाऊबीज हा हिंदूधर्मीय भाऊ बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. या सणाला हिंदी मध्ये भाईदुज म्हणतात.

Bhaubeej Information In Marathi

Bhaubeej Information In Marathi

आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची प्रथा असते, दिवाळी पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज होय, कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो या यमद्वितिया असेही म्हणतात.

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलवले होते, यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, व यमराजाने आपली बहिण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले अशी पौराणिक कथा आहे. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्यावर्षी यमापासून भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो.

रक्षाबंधन मराठी निबंध | Essay On Raksha Bandhan In Marathi

हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया, द्वितीयेचा चंद्र आकर्षक,वर्धमानता दाखवणारा आहे,तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन राहो हि त्यामागची भूमिका आहे.

बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनचा हा दिवस आहे, समाजातील सर्व भगिनींचा समाज व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्याचे स्वरक्षण करतील , त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील हा प्रण करून त्याप्रमाणे वागण्याचा हा दिवस आहे.

या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्रकोरीस नंतर भावाला ओवाळते ,भाऊ मग ओवाळणी म्हुणुन भेटवस्तू देऊन बहिणीचा सत्कार करतो. काही समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन चित्रगुप्ताची पूजा करतात.

बहिणीचे असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नाहीमीच हात

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Wishes In Marathi

जर काही कारणाने बहिणीला कोण्ही भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्र ला भाऊ समजून ओवाळते ,भावा बहीण एकमेकांची विचारपूस करावी एक मेकांवर प्रेम करावे या साठी सण साजरा करतात.


हे सुद्धा वाचा:-

धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi

दिवाळी शुभेच्छा संदेश | Diwali Wishes In Marathi

दिवाळी वर मराठी निबंध | Diwali Marathi Nibandh

दसरा सणाची संपूर्ण माहिती | Dussehra Information In Marathi

FAQ’s

२०२3 मध्ये भाऊबीज केव्हा आहे?

भाऊबीज शनिवारी १५ नोव्हेंबर २०२3 या दिवशी आहे.

भाऊबीज का साजरी करतात?

बहीण बदल आदर निर्माण होवा आणि बहीण-भावांमधील प्रेम कायम टिकून राहावे आणि बहीण हि भावासाठी त्याच्या दीर्घ आयु साठी प्रार्थना करते.

भाऊबीज म्हणजे काय?

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो या यमद्वितिया असेही म्हणतात. बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते.

हे पण वाचा

close