Mahashivratri information in marathi, Mahashivratri Essay In Marathi, mahashivratri 2024 Mahiti In Marathi.
महाशिवरात्र हा हिंदु बांधवांचा एक पवित्र सण आहे, जो अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो, महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी साजरा केला जातो, इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. या दिवशी शिवभक्त उपवास ठेवतात.
व भगवान शंकराची आराधना करतात. महाशिवरात्री संबंधित खूप पौराणिक कथा प्रचलित आहे, त्यापैकी एका कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी विषही निर्माण झाले होते या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती, या जगला विष च्या प्रभावापासून वाचविण्याकरिता आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती, भगवान शंकरानी हे हलाहल विष स्वतःच विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले.
हे विष त्यांनी आपल्या कंठात ठेवले, विष शक्तिशाली होते व भगवान शंकरांना त्यामुळे वेदना होत होत्या, म्हणून वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला.
रात्रीच्या वेळी भगवान शिव याना जागी ठेवण्यासाठी देवतांनी संगीत वाजविले व नृत्य केले, व सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिर फुलांनी सजविले जातात, शिवाच्या मंदिरांमधे महाशिवरात्रीला मोठया संख्येने भाविकांची गर्दी दिसुन येते. मोठया संख्येने शिवभक्त मंदिरात शिवाचे दर्शन व पूजन करतात, बेलाची पाने , दूध , पांढरी फुले वाहून शिवलिंगाची पूजा करतात, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनातील दुःख व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
हे सुद्धा वाचा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Mahashivratri Wishes In Marathi
होळी शुभेच्छा मराठी | Holi Wishes In Marathi
होळी सणा बद्दल माहिती | Holi Information In Marathi
यंदा महाशिवरात्री १8 फेब्रुवारी २०२3 रोजी साजरी करणार आहेत.