होळी सणा बद्दल माहिती | Holi Information In Marathi

भारत हा संस्कृती प्रधान देश आहे , भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्व आहे, या सणापैकी होळी एक सण आहे , नेपाळी लोकांचा हा एक महत्वाचा सण आहे, फाल्गुन महिना येताच होळीची चाहूल लागते, हा सण फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुनी पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस साजरा केला जातो.

हा सण विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्सहाने साजरा केला जातो, होळी हा आनंदाचा , उत्सहाचा आणि रंगाचा सण आहे, होळी या सणाला होळी पौर्णिमा व शिमगा असेही म्हटले जाते , महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे , शेणकुटे मंत्रोचारत जाळली जातात.

पेटलेल्या होळी भोवती लोक गोल प्रदक्षिणा घालतात , त्या होळीला नारळ अर्पण करून पुरण पोळीचा नैवेध दाखवतात , अश्या पद्धतीने भारतात पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन केले जात्ते , गावागावांमध्ये शहरामध्ये असे लोक एकत्र येऊन एकच होळी पेटवतात.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो , या दिवशी लोक एकमेकांना गुलाल रंग लावून रंगांची उधळण करतात विशेतः तरुण वर्ग हा सण उत्सहाने साजरा करतात , सर्वानी एकत्र येणे , बंधुभाव आणि एकतेने आनंद साजरा करणे हाच या मागचा उद्धेश आहे.

फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी सण येतो त्यावेळी रंगीबिरंगी झालेले लोक नाचत गात टिकटिकांनी फिरतात, कोकणात होळीचा उत्सव मनाला जातो, हा सण फाल्गुन महिन्यात येणार असल्यामुळे सर्व शेतीची कामे संपलेली असतात.

शेतकरी याचा हा निवांत काळ असतो त्यामुळे हा सण साजरा होतो , होळी या सणाची महाराष्ट्र च नाही तर भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा प्रसिद्धी आहे , लहान मुले या सणाची आतुरतेने वाट बघतात , कारण रंग लावून रंगीबिरंगी होऊन मजा करायला सर्वांचं आवडते.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण काही न काही संदेश देतात , त्याच प्रमाणे अशुभ आणि अमंगल होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे आणि चांगल्या , शुभ गोष्टीचा स्वीकार करायचा हा संदेश होळीचा सण देतो.


You may also like...