Narali Purnima Information In Marathi | नारळी पौर्णिमा माहिती मराठी

Narali Purnima Information In Marathi, Narali Purnima 2022

Narali Purnima Information In Marathi: नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत नारळी पौर्णिमा बद्दल, नागपंचमी नंतर श्रावणात येणारा दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा हा सण विशेषतः समुद्र किनारी राहणारे बांधव व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे.

पावसाळ्यात समुद्र हा वादळ व वाऱ्यामुळे प्रचंड खवळलेला असतो त्या मुळे कोळी बांधव या दरम्यान समुद्रात जात नाही, या काळामध्ये बोटी व जहाजांची वर्दळ बंद असते.

या वादळी व लाटा मुळे कोणालाही हानी पोहचू नये , जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून कोळी बांधव , समुद्र शांत होण्यासाठी या दिवशी समुद्राची पूजा करतात व समुद्रकिनाऱ्यावर नारळाचेच उत्पन्न मोठे असते म्हणून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.

हि पूजा झाल्यानंतर पुन्हा मासे पकडण्यास व जहाज द्वारे होणाऱ्या व्यवहारास सुरवात होते.

Narali Purnima Information In Marathi

मित्रानो समुद्र किनाऱ्यावरील कोळी बांधव याच जीवन हे सागराशी निगडीत असते, कोळी बांधव आपला उदरनिर्वाह साठी मासेमारीचा व्यवसाय करत असतात त्यामुळे समुद्राबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो

श्रावणातील पौर्णिमेला भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या विधी केल्या जाता, जसे कि भारतातील काही भागा मध्ये या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. म्हणून या दिवसाला राखी पौर्णिमा किंवा राखी पूनम असे सुद्धा म्हटले जाते.


हे सुद्धा वाचा:-

रक्षाबंधन मराठी निबंध | Essay On Raksha Bandhan In Marathi

नागपंचमी मराठी निबंध | Nagpanchami Marathi Nibandh

नारळी पौर्णिमा कधी आहे?

ह्या वर्षी १२ ऑगस्ट , वार शुक्रवार 2022 रोजी नारळी पौर्णिमा आहे

नारळी पौर्णिमा कश्या प्रकारे साजरी केली जाते?

नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा करतात , कोळी बांधव आपला पारंपरिक वेश परिधान करतात , कमरेला रुमाल व अंगात टीशर्ट आणि डोक्यला टोपी आणि स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करून समुद्राची नारळ फुले वाहून पूजा केली जाते.

हे पण वाचा

close