Pongal Festival Information in Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत “पोंगल” या सणाविषयी माहिती.
पोंगल हा भारतातील तामीळनाडु राज्यात साजरा होणारा एक महत्वाचा उत्सव आहे. तमिळ हिंदु समाजात या सणाचे विशेष महत्व दिसुन येते.
पोंगल या शब्दाचा अर्थ उकळणे तसेच त्याचा दुसरा अर्थ नवीन वर्ष देखील होतो, या दिवशी सूर्याची पूजा करून गूळ आणि तांदूळ उकळून व तो प्रसाद म्हणून दिला जातो.
पोंगल हा सण तामीळनाडु मध्ये चार दिवस साजरा केला जातो, चार दिवसाचा हा सण संपूर्ण पणे निसर्गाला समर्पित असतो.
हा सण पिकांच्या कापणीनंतर साजरा केला जातो तसेच नवीन भाताचा तांदूळ काढणे, त्याचा नेवेद्य बनवणे, बैल आणि घरे स्वच्छ करणे आणि त्यांना सजवणे. आणि भाई दुज प्रमाणे सर्व बहिणींनी भावांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
पोंगल या सणाचा संबंध कृषी व शेतीशी निगडीत आहे. पिकपाणी चांगले झाल्यास हा सण अतिशय आनंदाने साजरा करतात. हा सण जवळजवळ 4 दिवसांपर्यत साजरा केला जातो आणि चारही दिवसाचे आपापले महत्व आहे.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2022 | Makar Sankranti Wishes Marathi
भोगी पोंगल
थाई पोंगल
मट्टू पोंगल
कान्नुम पोंगल
1) भोगी पोंगल:
या सणामध्ये पहिल्यादिवशी भगवान इंद्राची पूजा केली जाते, इंद्र देवता पावसाची आणि आकाशाची देवता म्हणुन ओळखले जाते, तसेच शेतकरी बांधवाना पाऊस पडणे हे अत्यंत महत्वाचं असते आणि इंद्र देवता हे पावसाची आणि आकाशाची देवता असल्याने त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्याकरिता आणि त्यांचे आशिर्वाद प्राप्त करिता पृथ्वीतलावर समृध्दी आणणाऱ्या इंद्र देवतेची प्रार्थना मनोभावाने करून हा पहिला दिवस साजरा करण्यात येतो.
2) थाई पोंगल:
पोंगल च्या दुसऱ्या दिवशी सूर्य ची पूजा केली जाते यामध्ये नवीन तांदूळ, मूग डाळ आणि गूळ नवीन भांड्यात टाकून केळीच्या पानांसह ऊस, आले इत्यादींची पूजा केली जाते. सूर्याला हा नैवेद्य सूर्यप्रकाशात केला जातो.
3) मट्टू पोंगल:
पोंगल च्या तिसऱ्या दिवस गायी आणि बैलांना समर्पित असतो, असे म्हणतात की शिवाच्या मुख्य गणांपैकी एक असलेल्या नंदीकडून एकदा चूक झाली, त्या चुकीसाठी भोलेनाथने त्याला बैलाच्या रूपात पृथ्वीवर जाऊन मानवांना मदत करण्यास सांगितले. बैल शेतकऱ्यासमवेत दिवसरात्र कष्ट करतात त्यामुळे या दोघांचे पुजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
4) कान्नुम पोंगल:
पोंगल चा अखेरचा दिवस या दिवशी कन्यापुजन देखील केले जाते. घरातील महिला चुन्याचा दगड, हळद, तेल आणि तांदुळ हे घेउन आपल्या भावाला ओवाळतात व व त्याच्या दीर्घ आयुष्याची आणि सुख समृध्दीची कामना करतात. त्यानंतर सर्वजण एकत्र येत आनंदाने जेवण करतात.
हे पण वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | Chatrapati Shivaji maharaj Quotes in Marathi
संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा | Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार | Netaji Subhash Chandra Bose Thoughts In Marathi
पोंगल हा भारतातील तामीळनाडु राज्यात साजरा होणारा एक महत्वाचा उत्सव आहे.
पोंगल या शब्दाचा अर्थ उकळणे तसेच त्याचा दुसरा अर्थ नवीन वर्ष देखील होतो
पोंगल ह्या सणाची सुरवात १४ जानेवारी ते १७ जानेवारी पर्यंत आहे.
मित्रानो आम्ही दिलेली माहिती आवडल्यास share करायला विसरू नका आणि या माहिती मध्ये काही चुका अडल्यास आम्हला संपर्क करा आम्ही त्वरित यात सुधार करू धन्यवाद