Bail Pola Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बैल पोळा यावर मराठी निबंध.
बैल पोळा निबंध मराठी | Bail Pola Information In Marathi
आपल्या भारतीय संस्कृतीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांपैकी हा एक सण सर्वात महत्वाचा आहे, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असल्यामुळे या सणाला विशेष महत्व आहे, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे, हा सण प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात येतो आणि श्रावण सुरु झाला कि अनेक सण सुद्धा सुरु होतात.
नागपंचमी, नारळी पौर्णिमा , रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी हे सण सरल्यानंतर , श्रावण पिंडोरी अमावसेला बैल पोळा हा सण येतो, हा सण बैलाचा विश्रंतीचा आणि शेतकऱ्याचा आनंदाचा असतो.
ह्या सणामध्ये सर्व शेतकरी उत्साही असतात, शेत मध्ये दिवसभर नांगरणी करून शेतकऱ्याची मदत करणाऱ्या बैलाचा हा हक्काचा दिवस असतो आणि प्रत्येक शेतकरी हा आपला बैल उठून दिसावा या साठी या दिवशी आपल्या बैलाची सजावट करीत असतो , या दिवशी शेतकरी बैलांना नधीमधी अंघोळ घालतात आणि नंतर त्यांना चरायला देतात, या दिवशी काही शेतकरी बैलाला त्याचा खांद्याला हळद आणि तूप लावून शेकतात, आणि त्याला खाड शेकणे असे म्हणतात.
बैलाच्या शिंगाना रंग लावून आणि त्याच्या पाठीवर नक्षी काम केलेली शाल पांघरतात, आणि सर्व अंगारवर गेरू चे टिपके, शिंगाना बेगड , डोक्यला बाशिंग , गळ्यात कवड्या, नवा कासरा , गुगराच्या मला ,पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे, अशा प्रकारे बैलाची सजवत केली जाते.
आपला बैल सर्वपेक्षा चांगला दिवस या करीत तो शक्य ठेवडे त्याला सजवीत असतो, त्यानंतर घरातील सुहासिनीला, बैलांना नाम ओढून, आणि ओवाळून त्याची पूजा करतात, आणि बैलांना खायला गोड पुरणाची पोळी नैवैध देतात, या दिवशी बैलाची राखण करणाऱ्या किंवा त्याची निघा राखणार्यांना सुद्धा नवीन कपडे घेतले जातात.
त्या दिवशी गावामध्ये सर्व बैलाची मिरवून काढली जाते, गावातील सर्व बैल जोड्या ना , सनई, ढोल, ताशे वाजवून त्यांना एकत्रित आणले जाते, बैल पोळ्याची दिवशी गावामध्ये उत्साही वातावरण असते.
आणि ज्याच्या घरी बैल नाही अशे लोक मातीच्या बैलाची पूजा करतात आणि त्यांना गोड नैवेध दाखवता, बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, त्या दिवशी त्यांना संपूर्ण दिवसभर विश्रांती दिली जाते.
शेतकऱ्याची घरी मिरवणूक झाल्यानंतर बैलाच्या स्वागतासाठी सुहासने त्याच्या दारी सडा मारून रांगोळी काढून स्वागत करतात, अशा प्रकारे बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहव वर्धक साजरा केला जातो.
उत्तर: ऑगस्ट 27, 2022
उत्तर: बैलांप्रती कृतज्ञता आणि सन्मान निर्माण व्हावा
उत्तर: श्रावण माहित्यात पिंडोरी अमावसेला बैल पोळा हा सण येतो
हे सुद्धा वाचा :
Ganesh Chaturthi 2021 In Marathi | श्रीगणेश चतुर्थी कधी आहे?
Vijaya Dashami, Dasara 2021 In Marathi | दशहरा विजय दशमी
Navaratri 2021 In Marathi | नवरात्री संपूर्ण माहिती