गुरूपौर्णिमेची माहिती आणि महत्त्व | Guru Purnima Information In Marathi

गुरू पूर्णिमा: गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः

नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत गुरु पौर्णिमा बद्दल, या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरु जणांना आमचा प्रणाम.

Guru Purnima Information In Marathi

आषाढ पौर्णिमेस गुरु पौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे सुद्धा म्हणतात या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे, गुरु पौर्णिमा जुलै महिन्यात मध्ये साजरी केली जाते ,

गुरु पौर्णिमा हा गुरूबद्दल आदर आणि समर्पण याचा सण आहे ,गुरु पौर्णिमा हि सर्व धर्मीय आपल्या गुरु ना आदर देण्याकरिता साजरा करता

आपल्या जीवनात गुरु ला खूप महत्व आहे , गुरु शिवाय कोण्ही महान असल्याची कल्पना हि केली जाऊ शकत नाही.

आपल्या जीवनातील आई वडील हे आपले पहिले गुरु , त्यानंतर शाळेत गेल्यावर आपल्याला नवे गुरु मिळतात , ते आपल्याला भाषा , शास्त्र , गणित ,इतिहास , भूगोल हे सारे विषय शिकवतात तसेच मैदानी खेळ , चांगले लेखन करणे , ह्या गोष्टी शिकवतात , स्वछता ,शिस्त मित्राशी मिळून वागणे , चांगला विचार करणे हे सारे शाळेतल्या गुरूकडून शिकायला मिळते.

आपण आपल्या गुरुचे आज्ञांचे पालन करायला हवे त्याचा आदर व सन्मान करायला हवा , चांगला अभ्यास करून गुरूचा , आई वडील , तसेच देशाचा नावलौकिक करायला हवा.

तुमचा स्वतःचा आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरु
कारण प्रचितीच झगझगीत तेजोलय त्याच्या पाठीशी उभं असत


You may also like...