Insurance Information in Marathi | विमा म्हणजे काय ?

Insurance Information in Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत विमा (Insurance) बद्दल माहिती आणि ते का आवश्यक आहे जाणून घेणार आहोत.

विमा म्हणजे अशी सुविधा आहे ज्यामध्ये आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नुकसान झाले , जसे कि आजारपणामुळे , अपघातयामुळे , मृत्यू झाल्यानंतर त्या विमा काडणाऱ्यास त्याच्या पश्चात कुटूंबास विम्याची रक्कम देण्याचे वचन विमा कंपनी देते.

Insurance Information in Marathi

या मध्ये विमा चे मुख्यतः तीन प्रकार आहे खालील प्रमाणे

  • १. जीवन विमा (Life Insurance)
  • २. आरोग्य विमा (Health Insurance)
  • ३. सर्वसाधारण विमा (General insurance)

जीवन विमा (Life Insurance):-

आर्थिक नियोजनाच्या दृष्टिटीने जीवन विमाने (life insurance) फार महत्व आहे , आपले जीवन हे आपल्या बरोबर च आपल्या आई वडिलांसाठी आणि आपली पत्नी मुले यान साठी फार महत्वाचे असते.

यांचे आयुष्य घरातील कमवता व्यक्ती वर आधारित असते अशासाठी आपण आपल्या पश्चात याच्यासाठी पैशाची तरतूत करून ठेवणे खूप गरजेचे आहे.

आणि अशी तरतूत आपण कमी पैशामध्ये आणि जास्तीत जास्त फक्त जीवन विमा (Life Insurance) च्या रूपात करू शकतो. व त्यासाठी आपण Term life insurance घेणे फार गरजेचं आहे Term insurance आपल्या कमी premium मध्ये अथवा हफ्त्यामध्ये जास्त रकम तुमच्या कुटूंबाला मिळून देते.

तेव्हा जेवढ्या कमी वयात तुम्ही Term insurance घ्याल तेवढा कमी हफ्ता तुम्हला लागेल, म्हणून नोकरी लागल्यावर लगेच एक Term plan नक्की काढावा.

उदाहरणार्थ : – समजा आपण १९९० या दरम्यान जन्मले असाल आणि तुम्हला १ कोटी चा विमा घायचा असेल ६५ वर्ष करिता तर आपल्याला वार्षिक साधारण आपल्या ६ ते ७ हजार हफ्ता premium म्हणून भरावा लागेल. म्हणजेच तुम्ही मोठी रकम तरतूत करून ठेवू शकता तुमच्या पश्चात तुमच्या कुटूंबासाठी.

पण या मध्ये मुद्दा असा आहे जर तुम्हला ६५ वर्ष काहीच झाले नाही आणि तुम्ही ६५ वर्षपर्यन्त तुम्ही जगला तर तुम्हला विमा ची रकम मिळणार नाही.

तर तुम्ही म्हणाल या विमाचा काय उपयोग , तर मित्रानो वयाच्या ६५ वर्षी जर तुम्हला अकस्मात काही झाले तर तुमच्या कुटूंबाला एक मोठी रकम मिळते जी कदाचित कमवणासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चित होईल त्या रकमेने तुमच्या पश्चात तुमच्या कुटूंबाची सोय होईल , मुलाच्या शिक्षणाचा आणि घर खर्च भागेल, त्यांना कोण्हा पुढेही मदत मागण्याची गरज पडणार नाही, म्हणून विमा किंवा Insurance गुंतवणूक नाही तर risk cover आहे.

आरोग्य विमा (Health Insurance):-

मित्रानो ज्या प्रकारे आपण आपण आपल्या गाडी च इन्शुरन्स करतो त्याच प्रमाणे जेव्हा आपण आपल्या आरोग्याचा इन्शुरन्स करतो त्याला Health इन्शुरन्स म्हणतात

ज्या प्रकारे गाडी मध्ये काही समस्या उदभवली कि इन्शुरन्स कंपनी तो सर्व खर्च उचलते त्याच प्रमाणे जेव्हा आपल्या काही आजार होतो आणि हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे लागते तेव्हा तो सर्व खर्च Health इन्शुरन्स कंपनी उचलते असं होऊ नये

पण कदाचित तुमच्या घरातील कोण्ही आजारी पडले आणि त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले आज या महागायच्या जमान्यात हॉस्पिटल चे बिल बघून भल्या भल्या ना घाम फुटतो

अश्या वेळेस Health इन्शुरन्स आपल्या उपयोगी पडतो तुमच्या घरामध्ये कुणीही आजारी पडले , किंवा घरातील कोणतेही सदस्य आजारी पडले किंवा मुले कोण्हालाही हॉस्पिटल मध्य दाखल करावे लागले अश्या वेळेस जर आपण Health इन्शुरन्स काढलं असेल

तर ती Health इन्शुरन्स कंपनी तुमच्या हॉस्पिटल चा बऱ्यापैकी सर्व खर्च उचलते , दिवसेन दिवस महागाई वाढत आल्यामुळे हॉस्पिटल चे खर्च सुद्धा वाढत चालाय

आज वेळ अशी आहे सध्या तापामुळे जरी दाखल व्हावे लागले तर कोणत्या हि हॉस्पिटल मध्ये १० ते २० हजार च्या खाली बिल येणार नाही आणि आजार मोठा असेल , त्याचा खर्च माध्यम वर्गीय परिवाराला न परवडणारा आहे

तर अश्या वेळेस आपण कष्टाने बचत केले पैसे काही दिवसात ह्या हॉस्पिटल खर्च मुले संपून जातात त्यामुळे मित्रानो आजच्या ह्या काळात
प्रत्येकानी आपल्या परिवाराच्या आणि स्वतःच्या सुरक्षेतेसाठी Health इन्शुरन्स काढलाच पाहिजे.

हेल्थ इन्शुरन्स हे फायदे (benefits of health insurance):-

सर्वात पहिला हेअल्थ इन्शुरन्स फायदा हा होतो कि तुमच्या बचत केले ले पैसे वाचता दुसरा फायदा म्हणजे आपले उपचार पूर्ण पणे कॅशलेस होतात म्हणजे आपल्याला आपल्या खिशातून एक रुपया सुद्धा भरायची गरज पडत नाही

जास्त करून हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सुविधा उपल्बध असते तिसरा फायदा हा कि तुम्ही लवकर म्हणजे तरुण वयात हेअल्थ इन्शुरन्स काढला तर तुम्हला premium कमी पडतो आणि त्यामध्ये बरेच आजार समाविष्ट असतात.

सर्वसाधारण विमा (General insurance):-

life इन्शुरन्स सोडून बाकीचे जितके type चे इन्शुरन्स असतात ते सर्व General इन्शुरन्स मध्ये येतात, General इन्शुरन्स ला non life इन्शुरन्स सुद्धा म्हटले जाते.

General इन्शुरन्स चे सुद्धा अनेक प्रकार असतात खालील प्रमाणे

सर्वसाधारण विमा विविध प्रकार (Types Of General Insurance)

  • आरोग्यविमा (Health Insurance):-

Health इन्शुरन्स मध्ये आपल्या सुरक्षेतेची हमी असते ज्यामध्ये आपल्या आरोग्याशी संबंधित उदभवणाऱ्या समस्या ची उपचाराचा खर्च कंपनी करते. या मध्ये आपण Health इन्शुरन्स करतात ठराविक काळापुरते आणि ठराविक रकम चा आपण इन्शुरन्स काढता हे आपल्यावर निर्बर आहे आपण किती रकम चा इन्शुरन्स काढताय आणि किती काळापुरते.

  • अपघात विमा (Accident Insurance):-

अपघात विमा म्हणजे ज्यामध्ये विमा कंपनी विमाधारक व्यक्तीस अपघातासाठी विमा संरक्षण देते. विमाधारक व्यक्तीस विमा कंपनीला ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून हप्त्याच्या स्वरूपात किंवा एक रकमी भरावी लागते

जर आकस्मिक आपला अपघात झाला तर अपघातामध्ये होणारे नुकसान भरपाई विमा कंपनी करते, तसेच जर अपघात आपला मृत्यू झाला तर आपल्या पश्चात कुटूंबास ती रकम दिली जाते

  • प्रवास विमा (Travel Insurance):- जर आपण कुठे प्रवास करायला निघालात आणि त्या प्रवासात आपल्या सोबत काही दुखापत झाल्यास तर या Travel इन्शुरन्स च्या मदतने आपल्याला पैशाची आर्थिक मदत मिळते आणि आपली जी पण आपली रकम ठरवलेली असते Travel इन्शुरन्स करता वेळी ती भरपाई होऊन जाते.

  • मोटार विमा (Motor Insurance):- या मध्ये आपले वाहनाचा आपण इन्शुरन्स काढता जर आपली वाहने चोरी ला गेली किंवा हरवली आणि अपघातांमुळे होणारे आर्थिक नुकसान आणि त्यानंतर भरपाई देण्याचे काम करते, तर इन्शुरन्स काढता वेळी ठरविक रकम आणि इन्शुरन्स रकम नुसार आपल्या भरपाई मिळते.

  • मालमत्तेचा विमा (Property Insurance):- या मध्ये नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी गृहविमा हा प्रकार अतिशय उयोगी उपडतो जसे कि ग्लोबल वॉर्मिंग, पूर, वादळे, अतिवृष्टी, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींमुळे शहरांचा धोका वाढला आहे. जर आपण Property इन्शुरन्स घेतला असेल तर अश्या कारणामुळे धोका पोहोचला तरी, आर्थिक भरपाई केली जाऊ शकते.

  • पीक विमा (Agriculture Insurance)

हे सुद्धा वाचा

ई श्रम कार्ड माहिती मराठी | E-Shram Card information in Marathi

सुकन्या समृद्धि योजना माहिती मराठी | Sukanya Samriddhi Yojana in Marathi

हे पण वाचा

close