Makar Sankranti Essay In Marathi | मकर संक्रांति वर मराठी निबंध

Makar Sankranti in Marathi: नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत या विषयावर मराठी निबंध

Makar Sankranti Essay In Marathi

मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात साजरा केल्या जाणारा सण आहे, मकर संक्रात हा दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी ला साजरा केला जातो. हा सण सौर कालगणनेशी संबंधित असा सण आहे, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.

२१ ते २२ डिसेंबरलाच सूर्याचे उत्तरायण सुरु झालेले असते, म्हणजे सूर्य उगवण्याची जागा दिवसेन दिवस उत्तरेकडे सरकते, संक्रात हि एक देवता मानली जाते, आणि ती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वाहन वर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे.

संक्रातीच्या आधल्या दिवशी भोगी या नावाने साजरा केला जातो, या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मिश्र भाजी, व लोणी असे पदार्थ केले जातात.

संक्रातीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महतव आहे, या दिवशी सर्व मित्रमंडळी , लहान मुले हे तिळगुळ , तिळाचे लाडू , तिळाच्या वड्या वाटून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत शुभेच्छा देतात, विवाहित स्त्रिया या दिवसापासून हळदी कुंकू करतात, यावेळी स्त्रिया एकमेकांना वाण वाटून तीळगुल घ्या गोड गोड बोला अश्या शुभकामना देतात.

रथ सप्तमी हा संक्रातीच्या हळदी कुंकवाच्या शेवटचा दिवस असतो , संक्रातीला तिळाचे फार महतव आहे, तीळ वापरणातला पहिला अर्थ स्निग्ध म्हणजे स्नेह मैत्री, अश्या तिळगुळ देवाण घेवाण करून स्नेह वाढवायचे, नवीन स्नेह बंध जोडायचे, जुने स्नेह बंध समृद्ध करायचे हाच हेतू असतो..

ह्या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे, तसेच या दिवशी लोक काळ्या रंगाची कपडे घालतात, कारण काली वस्त्रे उष्णता शोषून घेतात , संक्रातीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.

अश्या प्रकारे भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सण पैकी , मकर संक्रात हा महत्वाचा सण आहे.

Real Also

Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2023

Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Republic Day Information In Marathi | प्रजासत्ताक दिन’!

हे पण वाचा

close