Ram Navami Wishes In Marathi, Ram Navami Wishes In Marathi 2022, Ram Navami 2022
राम नवमी हा हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक आहे, प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला, यंदा राम नवमी रविवार १० एप्रिल २०२२ रोजी आहे, या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, अलौकिक, दिव्य पुरुष आणि रघुकुलदीपक असलेल्या श्रीरामांच्या नावाने ही तिथी राम नवमी म्हणून साजरी केली जाते, प्रभू श्रीराम हे पितृवचन, मातृवचन, एकवचनी आणि आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते, त्यामुळे या रामनवमीला आवर्जून एकमेंकाना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
श्रीराम नावाचा अर्थ जो जाणत नाही,
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात श्रीराम नाही,
तो सगळ्यात मोठा दुर्भागी,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री राम नवमी निमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
।। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! ।।
दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!
ज्यांच्या मनात श्रीराम,
त्यांच्या भाग्यात वैकुंठधाम.
ज्यांनी श्रीरामांना जीवन अर्पित केले आहे,
त्यांचे नेहमी कल्याण झाले आहे.
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र
आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
। श्रीराम नवमीच्या शुभेच्छा ।
शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आयोध्याचे वासी राम,
रघूकुळाची ओळख राम,
पुरुषांमध्ये आहे उत्तम राम,
सदा जपावे हरीचे नाम.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांचा कर्म धर्म आहे..
ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!
30 मार्च 2023
कारण या दिवशी भगवान रामाचा जन्म झाला होता.
हे सुद्धा वाचा:-
हनुमानजयंती विषयी माहिती मराठीमध्ये | Hanuman Jayanti Information In Marathi
धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi
दिवाळी शुभेच्छा संदेश | Diwali Wishes In Marathi
भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती | Bhaubeej Information In Marathi