What Is GST Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत GST म्हणजे काय?
अशे अनेक प्रश्न GST संबंधित लहान मोठया, उद्योजकाच्या मनात येतो , GST बद्दल त्याच्या मनात एकतर तिटकारा असतो किंवा भीती पण लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे कि GST टॅक्स ग्राहक देत असतो आणि विक्री करणाऱ्याने किंवा सेवा देणाऱ्याने हि टॅक्स ची रकम GST पोर्टल द्वारे शासनाकडे भरायची असते.
भारत सरकारच्या नियमानुसार कोणत्याही व्यवसायात GST फाईल करणे आता गरजेचं आहे, GST हा आपल्या रोजच्या वापरातील शब्द झालेला आहे.
आपण नेहमी जाहिराती व बातम्या माध्यमातून आपल्या कानावर पडत असतात , GST आम्लात आणणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक खूप मोठं पाऊल ठरलं आहे.
आता जाणून घेऊया GST म्हणजे काय ?
GST म्हणजे GOODS & SERVICES TAX म्हणजेच वस्तू सेवा कर, १ जुलै २०१७ रोजी आपल्या देशात GST कायदा लागू केला गेला.
GST लागू झल्याबरोबर बाकीचे सर्व कर हटवले गेले जस कि व्हॅट, सेवा कर इत्यादी.
GST च्या संबंधित निर्णय देणारी एक विशेष परिषद आहे , GST चे सध्या चार SLABS आहे ५% , १२% , १८ %, आणि २८ % कोणत्या वस्तू साठी अथवा किती TAX असावा याचा निर्णय हि GST परिषद घेते.
ज्या प्रमाणे आपला १० आकडी मोबाईल नंबर असतो त्याच प्रमाणे GST नंबर हि एक १५ आकडी संख्या आहे, आता कोणतीही वस्तू खरेदी करताना आपल्या GST नंबर सहज दिसून येतो.
आता आपण जाणून घेऊया GST Registration ची कु णाला गरज असते
ज्या व्यवसाय धारक कडे VAT , EXCISE , SERVICE TAX सर्टिफिकेट होते त्या व्यवसायसाठी GST नोंदणी करणे बंधन कारक करण्यात आलं.
E – Commmerce व्यवसाय , उत्पादक , सेवा पुरवठा दार , वितरक याना देखील GST नोंदणी आवश्यक आहे , पण यासाठी आपल्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ४० लाख पेक्षा जास्त असायला हवी.
४० लाख च्या आत उलाढाल असणाऱ्या तसेच नुकतेच व्यवसाय सुरु करणाऱ्याना हे रेजिस्ट्रेशन ऐच्छिक आहे.
GST नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
व्यवसाय मालकास त्याच्या GST नोंदणी फॉर्म सह काही कागद पत्रे सादर करणे आवश्यक आहे
जसे कि अर्जदाराचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड कॉपी तसेच incorporation certificate आणि आपला व्यवसाय रेजिस्ट्रेशन चा पुरावा
त्याच बरोबर फोटोसह प्रमोटर अथवा डायरेक्टर ची ओळख पत्र आणि adress proof
जसे कि ड्रायविंग लेसन्स , वोटर id किंवा बँक पासबुक कॉपी
business चे address proof या साठी आपणास electricity बिल आणि rent agreement कॉपी किंवा index II कॉपी जमा करावी लागेल
तसेच या बरोबर बँक अकाउंट स्टेटमेंट किंवा cancel चेक जोडावा लागतो आणि डिजिटल signature.
डिजिटल signature हि DSC Certificate तुमची एक डिजिटल formate मध्ये signature असते GST नोंदणी साठी हि गरजेचं असते
आता बघूया GST नोंदणी केल्याचे फायदे
GST ची नोंदणी मुळे आपणास वस्तू किंवा पुरवठा दार म्हणून legally ओळख मिळते ,
वस्तू विकत घेणाऱ्याकडून आपण अधिकृत पणे टॅक्स collect करू शकता आणि वस्तू विकत घेणाऱ्या ना टॅक्स क्रेडिट हि पास करू शकता नियमित पणे आणि वेळेवर GST भरणाऱ्यांना बरेच बँक GST OD LOAN देता , त्याचा फायदा घेण्यासाठी व्यवसायीकांनी आपल्या बँक मध्ये संपर्क करावा.
GST च्या ह्या एका टॅक्स मुळे कित्येक indirect टॅक्स मधून आपली सुटका झाली आहे आणि कर प्रक्रियेमुळे मोठी पारदर्शकता आली आहे Service टॅक्स आणि वस्तू वरचा टॅक्स एकत्रित झल्याने कर भरणा प्रक्रिया आणि टॅक्स compilance process फारच सोपी झाली आहे. GST नोंदणी करण्याकरिता आपण स्वतः हि GST पोर्टल वर जाऊन करू शकता. किंवा CA ची मदत घेऊ शकता.
हे सुद्धा वाचा
विमा म्हणजे काय | Insurance Information in Marathi
ई श्रम कार्ड माहिती मराठी | E-Shram Card information in Marathi
सुकन्या समृद्धि योजना माहिती मराठी | Sukanya Samriddhi Yojana in Marathi