Christmas Essay In Marathi | नाताळ मराठी निबंध

Christmas Essay In Marathi , Natal Marathi Nibandh, नाताळ – मराठी निबंध

नमस्कार मित्रानो इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नाताळ या विषयावर मराठी निबंध.

Christmas Essay In Marathi

आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती आणि धर्माचे लोक एकजुटीने राहतात, त्यामुळे भारत देशाला सर्वधर्म समभाव असलेला देश म्हणून संबोधले जाते, भारत या देशामध्ये प्रत्येक धर्माचे लोक आपला सण मोठ्या उत्सहाने साजरा करतात. आणि त्याच सणांपैकी आहे नाताळ हा सण, नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण आहे.

हा सण भारतात च नवे तर भारत देशा बाहेरील इंग्रजी भाषिक देशामधील लोक हि साजरा करतात, तसेच नाताळ या सणाला ख्रिसमस सुद्धा म्हटले जाते, नाताळ हा सण प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर रोजी असतो. हा सण येशू च्या जन्मानिमित्त साजरा केला जातो, येशू ये ख्रिस्ति धर्माचे संस्थापक मानले जातात. हे एक महान व्यक्ती होते, येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण दिली.

ख्रिश्चन लोकांसाठी हा सण आनंदाचा आणि हर्षाचा सण आहे, जशी पौर्णिमा व अमावस्या या तिथी जश्या चंद्रावर अवलंबून असतात , तास प्रकार ख्रिस्ति कालगनात नाही, ख्रिस्ति कालगणेत सूर्य ब्राह्मणालाच अधिक महत्व दिले जाते.

ख्रिस्ति धर्माचे लोक हे या सणाची तयारी १० दिवस अगोदर पासून च सुरु करतात, बाजारातून नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी तसेच आपल्या घरातील साफसफाई करणे, आणि गोड पदार्थ बनवण्यास सुरु करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | Chatrapati Shivaji maharaj Quotes in Marathi

२४ डिसेंबर च्या रात्रीपासून येशू ची प्रार्थना करण्यास सुरवात केली जाते, आणि २५ डिसेंबर ला येशूचा जन्म दिवस साजरा केला जातो, या दिवशी सर्व ख्रिस्ति धर्माचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्च मध्ये जातात, आणि या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्याची गळा भेट घेऊन शुभेच्या देतात.

शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा | Shivjayanti Shubhechha Wishes In Marathi

या दिवशी चर्च आणि दुकाने तसेच आपली घरे सुंदर रोषणाई सजविले जातात, ख्रिसमस ट्री उभारून त्यास सजविले जाते ,ख्रिसमस ट्री हे मंगल कामनेचे प्रतीक मानले जाते, नाताळचा दिवशी मध्यरात्री Santa हा लहान मुलास भेट वस्तू देतो असा समज आहे.

सांता क्लॉज़ हि काल्पनिक वक्तिरेखा असून त्याला मराठी नाताळबाबा असे म्हटले जाते , सांता क्लॉज़ हे नाताळ या सणाचे प्रमुख वैशिट्य आहे, या दिवशी काही भाविक उपवास करतात आणि सणानिमित्त घरोघरी केक चॉकलेट, बिस्कीट , अशे पदार्थ बनविले जातात.

अश्या पदतीने नाताळ हा सण सगळीकडे अत्यंत उत्साहाने व आनंदमय साजरा केला जातो.

हे सुद्धा वाचा:-

“गुड फ्रायडे” कोट्स मराठी 2022 | Good Friday Quotes in Marathi

जागतिक विज्ञान दिवस | Science Day Information In Marathi

जागतिक टेलिव्हिजन दिवस | World Television Day


FAQ’s

(नाताळ) ख्रिसमस केव्हा आहे?

नाताळ हा सण प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर रोजी असतो

नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण का साजरा करतात?

२५ डिसेंबर ला येशूचा जन्म दिवस साजरा केला जातो, हा सण येशू च्या जन्मानिमित्त साजरा केला जातो.

सांता क्लॉज़ काय आहे

सांता क्लॉज़ हि काल्पनिक वक्तिरेखा असून त्याला मराठी नाताळबाबा असे म्हटले जाते

हे पण वाचा

close